तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ४ जानेवारीपासून नाव नोंदणीस सुरुवात

रावेर प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या आधारभूत किंमतीवर आधारीत तूर खरेदी केंद्राकरीता तूर उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी दि . ४ जानेवारीपासून सुरूवात होत आहे.

केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या खरेदी प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दरात तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नावनोंदणी करण्यासाठी तूर या पिकाचा पीकपेरा नोंदवून तलाठी यांची स्वाक्षरी असलेला ७/१२ उतारा, बैंक पासबूक व आधारकाई यांची झेरॉक्स असलेले दस्ताऐवज आवश्यक आहे . मोबाईल नंबरसह रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन खरेदी विक्री संघाचे विनोद चौधरी यांनी केले आहे.

Protected Content