यावल-भुसावळ मार्गावर मोटरसायकलींची समोरासमोर धडक; तीन जखमी

यावल प्रतिनिधी-येथील शहरापासुन एक किलोमिटर लांबीच्या अंतरावर यावल ते भुसावळ मार्गावर सांयकाळच्या सुमारास झालेल्या दोन मोटरसायकलींच्या अपघातात एका लहान चिमकुलीसह तिन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की आज दिनांक ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३०वाजेच्या सुमारास यावल हुन अंजाळे गावाकडे आपल्या मोटरसायकलने जाणारे गौरव धनराज साळुंके( वय २२ वर्ष), अनिता धनराज साळुंके (वय ४२ वर्ष) व नंदीनी प्रमोद सपकाळे (वय ७ वर्ष) सर्व राहणार अंजाळे याच मार्गावरील पॅट्रोल पंपावरून बाहेर जात असतांना समोरून येणाऱ्या प्रमोद शामराव कुंभार वय५४ वर्ष राहणार नशिराबाद जि. जळगाव यांच्या ताब्यातील मोटरसायकलींच्या समोर समोर झालेल्या अपघातात तिन जण जखमी झाल्याची घटना घडली.

याच वेळीला भुसावळ हुन येणारे व यावल येथे राहणारे कदीर गफुर पटेल , शाहरूख कबीर पटेल, शरीफ सलीम पटेल व जैद मुशिर पटेल हे ड्रायफ्रुट विक्रेते आपल्या मालवाहतुक करणाऱ्या एमएच १९ सिडब्लु०६८७या वाहनाने येत असतांना त्यांनी समय सुचकता बाळगुन माणुसकी धर्म पाळत तात्काळ अपघात स्थळी आपले वाहन थांबवुन अपघातातील जखमींना आपल्या वाहनातुन त्वरित यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. यावल ग्रामीण रुग्णालयात या तिघ जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ .बी.बी. बारेला व त्यांचे सहकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी औषद्य उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी भुसावळच्या खाजगी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे . दरम्यान या अपघाता संदर्भात यावल पोलीस स्टेशनला अद्याप कुठलीही नोंद नसल्याचे कळते.

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content