अमळनेरात माळी समाज ओबीसी आरक्षण निर्धार मेळावा उत्साहात

माळी समाज व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ केंद्रीय माळी समाज सुधार मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरात नुकतेच  माळी समाज ओबीसी आरक्षण निर्धार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला समाज बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी  माळी समाजाचे नेते माजी नगराध्यक्ष भरत माळी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, माजी आ.शिरीष चौधरी, जि.प.सदस्य नानाभाऊ  महाजन, माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर,  सुधारणा मंडळाचे अध्यक्ष ए के गंभीर, सेवानिवृत्त तहसीलदार सुदाम महाजन , समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख अनिल नाळे, केंद्रीय माळी समाज सुधार मंडळाचे बाबुराव घोंगडे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, निळकंठ महाजन, नगरसेविका संध्या महाजन चोपडा, नगरसेवक बापू महाजन, अनिल माळी, सुनील महाजन,हनुमत महाजन, सचिन महाजन, किशोर महाजन धानोरा, संजय महाजन धानोरा,  महेंद्र महाजन किनगाव, किरण माळी सर दहिवद, प्रवीण महाजन दहिवद, सुधाकर महाजन पिंपली, रवींद्र महाजन पिंपली, बापूराव महाजन शिरूर सुरेश महाजन चोपडा शंकर महाजन लासुर, एन डी माळी, आय आर मगरे सर तळोदा, प्रकाश महाजन उल्हासनगर, डॉ भावना महाजन लासुर रेखा महाजन मुंबई, रोहिणी महाजन मुंबई, मंगलाताई महाजन अमळनेर, अलकाताई महाजन खर्ची, उत्तम महाजन , गंगाराम निंबा महाजन, अमळनेर गणेश शंकर महाजन ,देविदास भगवान महाजन अमळनेर ,अमळनेर, आत्माराम देबचद शिरपूर, चंद्रकांत ताराचंद महाजन शिरपूर, रवींद्र महाजन शिरपूर कैलास महाजन पारोळा ,रवींद्र महाजन पारोळा, संजय महाजन, दिपक महाजन पुणे,लीलाधर महाजन पुणे यांची उपस्थिती होती.

ओबीसी आरक्षण हे ओबीसी बांधवांसाठी त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेहून अधिक किंमती असून कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.

याप्रसंगी सेवानिवृत्त तहसिलदार सुदाम महाजन मार्गदर्शन करताना म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणाला बाधा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओबीसींच हे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्व ओबीसी घटकांना एकत्रित करून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी ओबीसी तील मोठा भाऊ म्हणून माळी समाजाने पुढाकार घ्यावा, ओबीसीच आरक्षण कायम ठेवण्यासाठी सर्व ओबीसी घटकांनी एकजूट ठेऊन आपला सहभाग कायम ठेवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी मनोगत मनोगत व्यक्त करता सांगितले की माळी समाज हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज असून,पण पोट जातींमध्ये विभागलेला आहे या सर्व पोट जाती एकत्र करून ओबीसी समाजाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मागे पूर्ण ताकदीने समाज उभा करावा लागेल. सांख्यिक दहशतवादाचे उत्तर सांख्यिक दहशतवादानेच द्यावे लागेल असे मत यावेळी व्यक्त केले. यावेळी माजी आमदार शिरिष दादा चौधरी यांनी यांनी भुजबळ साहेब यांच्यामागे ओबीसी समाजाची ताकद उभी करू असे सांगितले तसेच सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रा. ए के गंभीर यांनी ओबीसी समाजाला आपली दिशा काय असायला हवी यासाठी यासाठी पंच सुत्री सांगितली.

यावेळी माळी समाज भूषण पुरस्काराने मुंबई येथील प्रा. प्रकाश संतोष माळी , पुणे येथील श्री लीलाधर मोतीलाल मगरे, तळोदा येथील उखाभाऊ गणपत पिंपरे , पहूर येथील विवेक एकनाथ जाधव, अमळनेर येथील मनोहर भगवान महाजन ,शिरपूर येथील बाबूलाल भिका महाजन, पारोळा येथील आनंदा महाजन , पहूर येथील योगेश भागवत बनकर, पिंपळगाव हरेश्वर येथील विठ्ठल नारायण गीते ,भोजे येथील मोतीलाल गणपत माळी यांचा सन्मान करण्यात आला.

Protected Content