साकेगाव येथील बंद घरात चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक

भुसावळ प्रतिनिधी । साकेगाव येथील बंद घरातून चार पंखे, गॅस हंडी, शेगडी आणि मिक्सर असा ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या संशयित आरोपीस भुसावळ पोलीसांनी अटक केली असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील साकेगाव येथील रहिवाशी बाळू वासुदेव आमोदेकर यांच्या राहत्या घराचे कडीकोयंडा अज्ञात चोरट्याने तोडून घरातील चार पंखे, गॅस हंडी, शेगडी आणि मिक्सर असा एकुण ५२ हजार रूपयांचा मुद्देमाला २२ जुन रोजी लंपास केला हेाता. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्यातील संशयित आरोपी गुरूलाल भगवानसिंग बिलाला (वय-४८) रा. बोगदरा ता.जि. खरगौण (म.प्र.) याला तालुका पोलीसांनी सापडा रचून अटक केली. चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

यांनी केली कारवाइ
विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनि अमोल पवार, पोहकॉ विठ्ठल फुसे, पोहेकॉ अजय माळी, युनुस शेख, पो.ना. विजय पोहेकर यांनी कारवाई केली.

Protected Content