रोझोदा येथे मोफत होमिओपॅथी औषधांचे वाटप

सावदा, प्रतिनिधी | रोझोदा येथील चिमण आत्माराम धांडे, चेतन चिमण धांडे, सौ.चंद्रा चेतन धांडे यांच्या चे.ची मीडिया पुणे व जळगाव येथील डॉ. अतुल पाटील यांच्या संयुक्त विदद्यमानाने सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून कोरोना या गंभीर संसर्गजन्य आजारापासून संरक्षणासाठी प्रतिकारशक्ती वाढीकरीता होमिओपॅथी औषधांचे श्रीराम मंदिरात मोफत वाटप करण्यात आले.

कोरोनापासून संरक्षणासाठी आर्सेनिक अल्बम, ब्राव्होनिया अल्वा, बेलाडोना ह्या तिन प्रकारच्या होमिओपॅथी औषधींचे वाटप रोझोदा येथे करण्यात आले. याप्रसंगी डॉ.अतुल पाटील, डॉ.संजय पाटील, नितीन चौधरी, श्रीराम मंदिर व कामसिध्द मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, रमेश महाजन, चिमण धांडे, उपसरपंच दिपक धांडे, दुर्गेश भोळे, रविंद्र चौधरी, भगवान केशव फेगडे, गुणवंत टोंगळे, सरपंच अर्चना बढे, गंगाराम नेहेते, वसंत बोंडे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content