उभ्या ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील सुसरी येथे उभ्या ट्रॅक्टरची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निवृत्ती नामदेव पाटील (वय-६५) रा. सुसरी ता. भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शेतीसाठी त्यांच्याकडे ट्रॅक्टर (एमएच १९ ईए ७७५४) देखील आहे. रविवारी २२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता त्यांनी त्यांचे ट्रॅक्टर हे घराच्या समोर लावलेले होते.

मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरला लावलेली बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीला आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर निवृत्ती पाटील यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाहेकॉ मनोहर पाटील करीत आहे.

Protected Content