महिलेचा विनयभंग करणाऱ्यावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवार १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गणेश सूर्यवंशी (पूर्ण नाव माहीत नाही) याने महिलेच्या जवळ येवून अंगलट करून करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. यासंदर्भात महिलने रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश सूर्यवंशी याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

 

 

Protected Content