नाथाभाऊंनी शिवसेनेत यावे : उदय सामंत

मुंबई । एकीकडे एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची चर्चा जोर धरत असतांना त्यांनी शिवसेनेत यावे असे जाहीर वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

भाजपचे असंतुष्ट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असतानाच त्यांना आता शिवसेनेकडून ऑफर देण्यात आली आहे. खडसे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करावे, असे शिवसेनेचे उपनेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. खडसे मोठे नेते असून त्यांनी राज्यात भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी खूप मेहनत घेतली, असेही सामंत यांनी म्हटले आहे.

एकनाथराव खडसे यांना आधी देखील शिवसेनेतर्फे ऑफर देण्यात आल्याची चर्चा होती. याबाबत अगदी थेट मातोश्रीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत याबाबत चाचपणी करण्यात आली होती. यानंतर आज उदय सामंत यांच्या जाहीर वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.