टेलीफोन नगरात बंद घर फोडले; रामानंदनगर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील ७ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना टेलीफोन नगरात उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की,  मधुकर काशीराम महाजन (वय-६५) रा. पाटील हॉल जवळ, टेलीफोन नगर हे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी आहे. त्यांचा मुलगा गौरव का नोकरीच्या निमित्ताने पुण्याला राहतो. त्यानिमित्ताने मधुकर महाजन हे पत्नी कल्पनाबाई यांच्यासह २२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता पुण्याला दवाखान्याच्या कामानिमित्त गेले. गावाला जाण्यापुर्वी घर बंद करून कुलूप लावले होते. १ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १.३० पुण्याहून परत आले. घरी आल्यावर त्यांच्या घराच्या दरवाजाचा कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४ हजार रूपये किंमतीचा सीसीटीव्हीचा डिव्हीआर मशीन, १ हजार ५०० रूपये किंमतीचा टाटास्काय कंपनीचा सेटटॉप बॉक्स, १ हजार ५०० रूपये किंमतीचा स्कायनेट कंपनीचे राऊटर असा एकुण ७ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच घरातील लाकडी व लोखंडी कपाटातील साहित्य अस्तव्यस्त करण्यात आल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी मधुकर महाजन यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे. 

Protected Content