हुतात्मा सागर धनगर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ! ( व्हिडीओ )

चाळीसगाव जीवन चव्हाण । मणिपूरमध्ये शहीद झालेले तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील रहिवासी सागर रामा चव्हाण यांच्या पार्थिवावर आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

मणिपूरमधील चकमकीत शहीद झालेले सागर रामा चव्हाण यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी दाखल झाले. यांनंतर हजारोंच्या उपस्थितीत त्यांची अंत्ययात्रा निघाली. यात देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमुले. अंत्ययात्रेच्या प्रारंभी तरूणांनी भव्य तिरंगा यात्रा काढून आपल्या सुपुत्राला विदाई दिली.

सुरुवातीस वीरजवान सागर धनगर यांच्या पार्थिवास सैन्य दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण, उप विभागीय अधिकारी श्री कचरे, तहसिलदार श्री मोरे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

या वीर जवानावर शासकीय इतमामात गावापासून जवळच असलेल्या तांबोळे टेकडी येथे मोकळ्या जागेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान सागर धनगर यांचा चुलत भाऊ देवेंद्र धनगर याने भावाच्या पार्थिवाला अग्नीडाग दिला. यावेळी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, तहसीलदार अमोल मोरे, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. ठेंगे, सैन्य दलातील मराठा बटालियनचे सुभेदार संपत आमले, हवालदार रोहिदास पाटील, भैय्यासाहेब पाटील व खानदेश रक्षक ग्रुपसह इतर विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अग्निडाग देण्यापूर्वी जवान सागर धनगर यांना सैन्यदल व पोलिसांतर्फे हवेत बंदुकीच्या गोळ्या झाडून मानवंदना देण्यात आली. अत्यंत शोकाकुल वातावरणात हुतात्मा सागर चव्हाण याचा पुतण्या देवेंद्र आनंदा धनगर याने पार्थिवाला अग्नीडाग दिला.

खाली पहा याबाबतचा व्हिडीओ वृत्तांत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/476888459981289

Protected Content