नगरदेवळ्यात मंत्री अब्दुल सत्तार यांचा सत्कार; कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनेक मुस्लीम कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

ना. अब्दुल सत्तार यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करीत मिरवणूक कालिका माता मंदिराजवळून मार्केट यार्ड पर्यंत काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. यावेळी आमदार किशोर पाटील, शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, जि. प. सदस्य पदमसिंग राजपूत, राजु राठोड, संपर्क प्रमुख सुनिल पाटील, पाचोरा शहर अध्यक्ष किशोर बारावकर, तालुका अध्यक्ष शरद पाटील, अविनाश कुडे, शिवणारायन जाधव, सुधाकर महाजन, अ.गणी शेख कमरुद्दीन हे उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी केले. त्यांनी गावाची भौगोलिक परिस्थिती सांगत नदीपत्राच्या खोलीकरणाचा व सौरक्षण भिंतीचा मुख्य विषय मान्यवरांच्या समोर मांडला व आमदार किशोर पाटील व त्यांच्या जिल्हापरिषद निधीतून केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची महिती दिली.

आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, असंख्य मुस्लिम कार्यकर्ते यांचा प्रवेश सोहळा बघून मी भारावून गेलो. मुस्लिम लोक दिलेला शब्द पाळतात याचा मी अनुभव घेतला आहे. त्यांनी ग्रामपंचायतीत आपल्यासोबत दिलेले तिघेही उमेदवार निवडून आणले आणि मी देखील त्यांच्याच मदतीने आमदारकिला निवडून आलो. आजपर्यंत त्या प्रभागांमध्ये आपले सदस्य नसल्याने त्या वार्डाचा विकास खुंटला पण आपण माझ्यावर विश्‍वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला त्याची परतफेड विकासकामे करून करेल असे उदगार काढले.

सत्काराला उत्तर देतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, शिवसेना हा हिंदूत्ववादी पक्ष असून त्यांचा झेंडाही भगवा आहे त्यांना हिंदुत्वाची पदवी देण्याची कुणाला गरज नाही. परंतु शिवसेना दिलेल्या शब्दाला जगणारा पक्ष आहे त्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे मी इथे या पदावर उभा आहे. त्यांनी हिंदू – मुस्लिम समाजातील प्रवेश केलेल्याचे अभिनंदन करीत आलेल्या निवेदनातील मुख्य म्हणजे शादी हॉल, नदीपात्र खोलीकरण, कब्रस्थांनचे रस्ते व सुशोभीकरण यासाठी मोठा निधी देणार असल्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सर्व निवडून आलेल्या सदस्यांचा व प्रवेश केलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य नूरबेग सुपडूबेग मिर्झा, बापु चौधरी, वसीम शेख, सुनिल महाजन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी येथे जाहीर प्रवेश केला. यावेळी कृष्णा सोनार, हबीब शेठ, जगन सोनी, सादिक बागवान, कन्हैया परदेशी, रऊफ दादा, अयुब मास्टर, राजेश जाधव, सागर पाटील, विनोद परदेशी, गोरख महाजन, अरविंद परदेशी, भैया महाजन, सोनू परदेशी, अन्सार बेग, विनोद राऊळ, मोहसीन शेख, रविंद्र पाटील, अन्वर शेख, अयास बेग, अजय बागुल, अमेश मोरे, भारत भामरे, दत्तू भोई, राकेश शिरुडे, उमेश लढे, निजाम खाटीक, कडू पाटील, धर्मराज पाटील, पियुष राजपूत, किरण पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन नाना वाघ यांनी केले तर आभार विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश कुडे यांनी मानले.

Protected Content