तातडीने महाविद्यालये सुरू करा : एबीव्हिपीची मागणी (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । राज्यात माध्यमिक शाळांसह अनेक क्षेत्र अनलॉक झाले असले तरी अद्याप महाविद्यालये उघडण्यात आलेली नाहीत. याचा निषेध करण्यासाठी राज्यातील कॉलेजेस तातडीने सुरू करण्यात यावीत या मागणीसाठी आज अखील भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यासंदर्भातील निवदेन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महाविद्यालये बंद आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षाचा निकाल लघोषित होऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमासाठी पार पडून मोठ्या संख्यने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. साधारण नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात महाविद्यालये सुरु होणे अपेक्षित असतांना अद्यापही प्रत्यक्ष शिक्षणासाठी महाविद्यालये सुरु झालेली नाहीत. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरु करण्यास शासनाची चालढकल सुरु आहे. या ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना अडचणी व त्याची परिणामतका आदी बाबींकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्य सरकारने दारूची दुकाने, मॉल, सिनेमा गृह व परिवहन सेवा तसेच पाचवी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु केल्या. महाविद्यालय बंद का ? असा प्रश्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विचारण्यात आला. यासंदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. याप्रसंगी जळगाव महानगराध्यक्ष प्रा. भूषण राजपूत, जळगाव महानगर मंत्री आदेश पाटील यांची स्वाक्षरी आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/914867169323596

Protected Content