प्रतापनगरातील सर्वोदय अपार्टमेंटमधून लॅपटॉपची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रताप नगरातून एकाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पंकज मधुकर भुतडा (वय-४४) रा. सर्वोदय अपार्टमेंट, प्रताप नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी घरातून चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. यासंदर्भात शनिवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.

Protected Content