जळगाव एमआयडीसीत बंद घर फोडले; २५ हजाराचा ऐवज लंपास

जळगाव (प्रतिनिधी) घर मालक गावाला गेले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडत २५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. एमआयडीसी परिसरासतील एन सेक्टरमध्ये ही घटना घडली.

दिल्ली येथील मुळ रहिवाशी असलेले गुलामनबी निजामउद्दीन खान यांची एमआयडीसी परिसरासतील एन सेक्टरमध्ये ए.के. फेब्रीकेशन नावाने कंपनी आहे. एन ३५ मध्ये कंपनीचे ऑफिस असून एन ३६ मध्ये गोडावून आहे. तर गोडावूनच्या वरील बाजूस असलेल्या घरात खान हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. १० मार्च रोजी खान यांचा मुलगा कंपनीच्या कामानिमित्त बदौडा येथे गेला होता. त्यामुळे घर बंद होते. दरम्यान, या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत कपाटातील ७ हजार ५०० रुपये रोख , ६ हजार रुपयांचे सोन्याचे कानातले व १२ हजार रुपये किंमतीची ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, असा एकुण २५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.  आज घरी परत आल्यानंतर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या प्रकरणी गुलामनबी निजामउद्दीन खान यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक अतुल वंजारी हे करीत आहेत.

Add Comment

Protected Content