मध्य प्रदेशातून मोटर सायकल चोरट्यास अटक

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मोटर सायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला रावेर पोलिसांनी मध्य प्रदेशच्या खंडवा येथून ताब्यात घेतले आहे. मोटर सायकल चोरणा-या अज्ञात चोरट्याविरुध्द रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.

रावेर शहरातील वशीम अब्दुल वाहेद खाटीक (वय ३४) या व्यापाऱ्यांची ३५ हजार रुपये किमतीची हिरो एच.एफ. डिलक्स कंपनीची काळ्या रंगाची त्यावर लाल पट्टे असलेली मोटार सायकल (क्रमांक एम.एच. १९ डि.जो.६४६०) ही रावेर शहरातील मरकज मशिद जवळील फिर्यादीचे अंगणातून कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने रावेर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध  भादवी कलम ३७९ प्रमाणे दि १० जून रोजी गुन्हा दाखल केला होता.

आरोपी यांचा गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक माहितीचे आधारे शोध घेऊन रावेर येथील राफरनगर, पाण्याची टाकीजवळ राहणाऱ्या शेख नदिम शेख जमोल (वय २५) या आरोपीस बंगाली कॉलनी, खंडवा (मध्य प्रदेश) येथे जावून यातील ताब्यात घेवून यातील चोरीस गेलेली मोटार सायकल हस्तगत केली आहे.

पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि शितलकुमार नाईक, पोना विष्णू भिल, पोना सुरेश मेढे, पोकों  समाधान ठाकूर, पोकॉ सचिन घुगे, प्रमोद पाटील, अमोल जाधव, विकार शेख, पोकॉ सुकेश तडवी यांनी चोरीच्या गुन्ह्यात यशस्वीरीत्या कामगिरी पार पाडली आहे.

Protected Content