आशिष शेलार यांनी घेतली पुन्हा राज ठाकरेंची भेट !

 

मुंबई (वृत्तसंस्था) आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. शेलार यांची ही राज ठाकरेंची दुसरी भेट आहे. विशेष म्हणजे याआधी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती.

 

राज्यात महाविकासआघाडी स्थापन झाल्यानंतर भाजप आणि मनसेमधील जवळीक सातत्याने वाढताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून भाजप नेत्यांच्या राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली होती. आज देखील राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. मनसेने हिंदुत्वाच्या मुद्यावर वाटचाल सुरु केल्याने भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावरील मनसेच्या मोर्चाच्या बरोबर आधी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. आता पुन्हा एकदा आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

Protected Content