जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील बेटावद बुद्रुक येथील युवा कार्यकर्ते व नागरीकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवून खंभीरपणे त्यांच्या पाठीशी असल्याची भावना व्यक्त केल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील यांच्याहस्ते प्रवेश सोहळा व शाखेच्या नवीन बोर्डाचे अनावरण करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामाला चालना देण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गाव तिथे शिवसेना शाखा स्थापन करणार असल्याची माहिती बेटावद बुद्रुक येथे शाखा उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. मनोहर पाटील यांनी केले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा उपसरपंच(शेळगाव) निळकंठ पाटील, उपतालुका प्रमुख अरूण पाटील, अशोक जाधव, कृष्णा चोरमारे, ॲड. भरत पवार, युवासेना तालुकाप्रमुख विशाल लामखेडे, युवा उपतालुकाप्रमुख रोहन राठोड, कार्यकारणी सदस्य मयुर पाटील, विकास अहीरे, गटप्रमुख तुकाराम गोपाळ, सागर कोळी, गोपाल कोळी सोशल मिडीया प्रमुख मुकेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यांनी केला शिवसेनेत प्रवेश
शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहरदादा पाटील यांच्याहस्ते वि.का.सोसायटीचे सदस्य नितीन मराठे, वैभव घोडके, गणेश नेहे, पुशोत्तम लंके, दिनेश पाटील, मनोज गरूड, जितेंद्र दंवडे, गोपाल दंवडे, रोहीत गरूड, दिपक थोटे, मधुकर वाघ, रामा पारधी, रोहित धनगर, विजय पाटील, रामा धनगर,पवन कान्हे, दिलीप काळे, नसिब बरडे, आदील शहा, शोकद तडवी, संतोष मिसाळ, गोपाल पावसे, आदेश इंगळे, गजानन राजपुत, रोहित गरूड, शुभम वैरी, लोकेश घोडके, सोपान पारधी, गुरु पारधी, गणेश आनकार, सुनील भोईटे, गणेश गरूड, ऋषीकेश पारधी, अजय लामखेडे, अर्जुन कान्हेआबा लंके यांच्यासह अनेक तरूणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
महापुरूषांच्या पुतळ्यास माल्यार्पण
याप्रसंगी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन करून गावात रॅली काढण्यात आली. यावेळी जुन्या शाखेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर कान्हे, मधुकर दारकोडे, अनिल नाईक, प्रकाश ठोबरे, गजानन लंके, रामचंद्र निळे, दिपक डिवरे, कैलास ठोबरे, भुषण गरूड, सुरेश पाटील, सोपान जाचक, शरीफ शहा याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थितांना उपजिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील, माजी युवासेना उपजिल्हाप्रमुख अॅड. भरतजी पवार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक रोहन राठोड यांनी केले तर आभारप्रदर्शन भुषण गरूड यांनी केले.