शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली ग्राहकांची लूट

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने राज्यातील बांधकाम कामगारांना आत्मनिर्भर करण्यासाठी मिळणाऱ्या संच व गृह उपयोगी वस्तु मिळुन देण्याच्या नांवाखाली काही ग्राहक सेवा केन्द्राकडुन गोरगरीब मजुरांची आर्थिक लुट करण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या असुन या सर्व प्रकाराची प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्तांनी तात्काळ चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , राज्यातील महाराष्ट्र इमारत व ईतर बांधकाम कल्याणकारी संस्धेच्या वतीने अधिकृत नोंदणी व्दारे सक्रीय असलेल्या बांधकाम मजुरांना शासनाच्या वतीने शुल्क अशी किरकोळ फ़ि जमा करून अधिकृत नोंदणी करुन त्या बांधकाम मजुरांना ग्रृहपयोगी वस्तु व बांधकाम साहीत्य ( संच ) पेटी देण्यात येते याशिवाय ५००० हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत व विविध सहाय्य त्या मजुरास वितरण करण्यात येत असते , या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेकडो बांधकाम मजुरांनी आपल्या नांवाची ऑनलाईन पद्धती अधिकृत नोंदणी केली असून, काही मजुरांच्या नावांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे . या राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवुन देण्याच्या नांवाखाली यावल शहरातील काही ग्राहक सेवा केन्द्राकडुन गोरगरीब बांधकाम मजुरांची दोन ते तीन हजार रूपये घेत आर्थिक लुट करीत असल्याचे प्रकार समोर येत असुन , याबाबत जळगाव येथील प्राधीकृत सहाय्यक कामगार आयुक्त यांनी तात्काळ चौकशी करून अशा प्रकारे शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या नांवाखाली गोरगरीब मजुरांची आर्थिक लुट करणाऱ्यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे

 

Protected Content