ऑक्सफर्डची कोरोना प्रतिबंधात्मक लस डिसेंबरमध्ये बाजारात येणार

पुणे वृत्तसंस्था । कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासंदर्भात भारतासह जगातील अनेक संस्था यासाठी अहोरात्र झटत आहे. ऑक्सफर्डबरोबर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचं ही योगदान आहे. ऑक्सफर्ड आतापर्यंत केलेल्या चाचण्यांना मोठे यश आले. त्यामुळे डिसेंबरमध्ये ही लस बाजारात येणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. संजीव ढेरे यांनी याबाबतची माहिती दिली.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी फेज वनमधील आशादायक परिणाम आहे. तसेच ही चाचणी सुरक्षित असून आवश्यक परिणामकारक आहे. त्यामुळे लस विकसित करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ऑगस्ट महिन्यात माणसांवर या लसीची ट्रायल होईल. साधारण पंधराशे ते दोन हजार लोकांवर ही ट्रायल होईल. मात्र एकीकडे चाचण्या सुरु असतानाच सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीचे उत्पादनही सुरु असल्याचं राजीव ढेरे यांनी सांगितले.

भारतात माणसांवरील चाचण्यांचे रिझल्ट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येतील. याच दरम्यान यूकेमधील चाचण्यांचे रिझल्ट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येतील. आमची उत्पादने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होईल. म्हणजेच येत्या डिसेंबरमध्ये ही लस उपलब्ध होईल, असा दावा राजू ढेरे यांनी केला आहे.

या चाचण्यांमध्ये पहिली चाचणी औषधाची सुरक्षितता पाहिली जाते. त्यांना कोणाला अपाय होत आहे. जो परिणाम साधायचा तो साधला जातो की नाही. यासाठी रक्ताचे नमुने काढले जातात. माणसाच्या शरीरात अँटी-बॉडीज तयार होतात. व्हायरस आला की ते अटॅक करतात आणि ते काढून टाकतात. पहिल्या चाचणीतील दोन टप्पे यशस्वी झाले आहेत. पुढचे टप्पे पण यशस्वी होतील, असा आशावाद राजीव ढेरे यांनी व्यक्त केला आहे.

सध्या चाचण्या चालू आहेत. त्या मोठ्या प्रमाणात होतील. 22 हजार लोकांवर पुढे चाचण्या होतील. त्याच बरोबर दुसऱ्या टप्प्यात त्याची निर्मिती होईल. या चाचण्यात चालू असताना निर्मिती सुद्धा सुरु आहे. निर्मिती हा एक मोठा भाग आहे.

Protected Content