मुक्ताईनगर येथे संतश्रेष्ठ संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | येथील संत रविदास महाराज उत्सव समितीने आयोजित केलेल्या जयंती उत्सवास समाज बांधवांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

संतश्रेष्ठ संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या ६४५ व्या जयंतीनिमित्त बुधवार दि. १६ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते कार्यक्रमाला पूर्णवेळ उपस्थित होते याप्रसंगी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही वेळात वेळ काढून कार्यक्रमाला भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रमुख वक्ते म्हणून आलेले डॉ. संजय भटकर यांनी आपल्या दमदार शैलीने समाज बांधवांना मार्गदर्शन केले. सुप्रसिद्ध डॉ. भगवान गोरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला समाजातील माता-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवरांनी भेट देऊन प्रतिमा पूजन केले. यात काँग्रेसचे ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील तसेच जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद सदस्य वनिता गवळे, माजी सरपंच ललित महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रतिमापूजन करून समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यशस्वीतेसाठी निलेश घुले, महेंद्र जयकर, मेजर कडू घुले, कैलासशेठ शिर्के, विनोद घुले, प्रवीण घुले, संतोष घुले, सचिन जयकर, सुनील जयकर, दिपक घुले, प्रवीण घुले, योगेश घुले, संजय निंभोरे सर, राजू घुले, दिपक जयकर, मोहन घुले, भरतशेठ चिमकर, फकीरा जयकर, भागवत शिर्के, अशोक तायडे, संतोष काकडे, रवी जयकर, योगेश काकडे, रवींद्र दांडगे, विनोद सुरवाडे, धनंजय शेठ एदलाबादकर, योगेश एदलाबादकर, पुरुषोत्तम ठोसे सर, अतुल हिंगोणेकर, यांच्यासह सर्व युवा व जेष्ठ समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

Protected Content