कोरपावलीत ‘नियोजित तोल काटा व धान्य गोदाम फलका’चे अनावरण

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील ‘कोरपावली’ येथील सहकार क्षेत्रातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत नवीन खरेदी जागेवर ‘तोल काटा व धान्य गोदाम नियोजित जागा’ असा फलक अनावरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

गावातील जागा विक्रेते शेतकरी हेमचंद कोळंबे यांचे हस्ते फलक अनावरण करण्यात आले. या प्रसंगी यावल तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कष्टाने पिकवलेले शेती धान्य शासनाच्या नियमाने पारदर्शकता ठेवून खरेदी करणाऱ्या कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने चेअरमन राकेश फेगडे यांनी हेमचंद कोळंबे यांनी संस्थेचे व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोणातून संस्थेला आपली जागा संस्थेच्या आग्रहास्तव विक्री करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

कोरपावली विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या स्वताःच्या जागेवर लवकरच तोल काटा व धान्य गोदाम बांधण्याच्या प्रस्ताव दाखल करण्यास संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याची माहीती सोसायटीचे चेअरमन तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे यांनी यावेळेस उपस्थित परिसरातील नागरिक व शेतकरी बांधवांना दिली.

कार्यक्रमास व्हा.चेअरमन आरती महाजन, संचालक सुधाकर नेहेते, यशवंत फेगडे, पंकज नेहेते, महेंद्र नेहेते, ललीत महाजन, एकनाथ महाजन, वर्षा नेहेते, वसंत तळेले, अफरोज अनवर पटेल, तुलशीदास कोळंबे, सोसायटीचे सचिव मकुंदा तायडे, सर्व कर्मचारी व शेतकरी आणि ग्रामस्थ यांची मोठया संख्येत उपस्थिती होती.

Protected Content