रेडक्रॉसचे कर्मचारी उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित

जळगाव, प्रतिनिधी । जागतिक रेडक्रॉस ८ मे रोजी साजरा केला जातो. यावर्षीच्या खास वैशिष्ट्य म्हणजे इंडियन रेडक्राँस सोसायटीचं हे शतक महोत्सवी वर्ष असून रेडक्रॉसचे संस्थापक सर हेनरी ड्युनांट यांचा जन्मदिवसा निमित्त हा दिवस साजरा करण्यात येत असून या दिनाचे औचित्य साधत जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा, सहायक लेखापाल संजय साळुंके यांना उत्कृष्ट सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 रेडक्रॉसचे माजी कार्यकारीणी सदस्य कै. डॉ उल्हास कडुसकर यांनी पुरस्क्रूत केलेला सन २०१९ – २०२० या वर्षाचा श्रीमती सरला दाते उत्कृष्ट सेवा पुरस्कार जनसंपर्क अधिकारी उज्वला सुनील वर्मा व सहायक लेखापाल संजय रघुनाथ साळुंखे यांना प्रदान करण्यात आला.  बोधचिन्ह व प्रत्येकी रोख रकम रु.२१००/- चे धनादेश रेडक्रॉस अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते देण्यात आले. वर्षभरात उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. कोरोना आपत्तीत उत्तम जनसेवा केल्याबद्दल यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, रक्त पेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सहसचीव राजेश यावलकर, आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख सुभाष साखला, रक्तपेढी सचिव अनिल कांकरिया,कार्यकारिणी सदस्य अनिल शिरसाळे, डॉ. प्रकाश जैन, लक्ष्मण तिवारी, महेश सोनगीरे उपस्थित होते. रेडक्राँस पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करण्यात आले.

Protected Content