चोसाका चेअरमन, संचालक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत – एस.बी.पाटील

chosaka

चोपडा, प्रतिनिधी | चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखानाचे चेअरमन व संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत असा आरोप शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस.बी.पाटील यांनी केला आहे.ते शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

एस.बी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सृष्टी शुगर प्रा.लि. पुणे व चोसकाचे चेअरमन अतुल भिमराव ठाकरे यांच्यातील शपथ पत्रात (नोटरी) तफावत आढळून येते. दि. ९ ऑक्टोबर रोजी डी. डी. परचेसर स्नेहलकुमार एम.पाटील यांच्या नावाने ५ कोटीचा (डी.डी.क्र. ०२६४५५) चोसाकाला देण्यात आला. मात्र ही व्यक्ती त्रयस्थ असून करारात त्याचा काहीच उल्लेख आढळत नाही. सृष्टी शुगर चे प्रोप्रायटर महेश काशीराज खैरनार व चोसाका यांच्यात भाडेतत्वाचा करार असून मग डी. डी. त्रयस्थ इसम स्नेहलकुमार पाटील यांच्या नावाने का? करारात हा डी. डी. तात्काळ वटविण्यासाठी टाकू नये अशी अट का घालण्यात आली? सहभागी तत्वावर कारखाना चालविण्याबाबत करार झाला आहे याचा अर्थ नेमका काय? असे प्रश्न त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित केले.चोसाका भाडे तत्वावर दिला जात नाही हे संचालक मंडळाचे अपयश असून त्यांचे खापर ते कृती समितीवर फोडत आहेत. संचालक मंडळ जो पर्यंत पदावर विराजमान आहे तो पर्यंत त्यांना शेतकऱ्यांचे व कृती समितीचे गाऱ्हाणे ऐकावे लागेल कारण आमचा पैसा व आमचा जीव त्यात अडकला आहे. तुम्हाला शेतकऱ्याचे ऐकायचे नसेल तर खुर्च्या सोडा असा संतप्त टोला त्यांनी यावेळी लगावला.सृष्टी शुगर कंपनी चोसाका भाड्याने घेत आहे मग एवढ्या मोठ्या कंपनीकडे आपले स्वतःचे लेटर हेड नाही का? या कंपनीचे एक पत्र हस्तलिखित आहे तर दुसरे पत्र अर्धवट टाईप व अर्ध हस्त लिखित असून त्यावर महेश खैरनार यांची स्वाक्षरी नाही. यात देखील तफावत दिसून येत आहे.महेश खैरनार हे परदेशात आहेत तर त्यांनी इमेल द्वारे आपल्या लेटर हेडवर पत्रव्यवहार का केला नाही?यात शंकेला वाव असल्याचे ते म्हणाले. त्याने एक रुपया न देता चोसाकावर सृष्टी शुगर कंपनीचे बोर्ड लागलेच कसे?चोसाकावर सदरचा बोर्ड लावून सृष्टी शुगर कंपनी कर्ज प्रकरणासाठी प्रयत्न करीत आहे असा आरोप देखील एस बी पाटील यांनी केला कायदेशीर बाबी पूर्ण करून कारखाना ई टेडरिंग द्वारे घेऊ ही कृती समितीला धमकी देण्याचा प्रकार असून जेवढा वेळ कायदेशीर कारवाईसाठी लागेल तेवढी व्याजासह रक्कम शेतकऱ्यांना भेटणारच आहे म्हणुन यात शेतकऱ्यांच काहीच नुकसान होत नाही.परंतु चोसाका लवकर सुरू व्हावा असा आमचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. चेअरमन चोपड्यात असतांना बाहेरगावी असल्याचे सांगतात निवडणूक पास करण्यासाठी हे डी. डी. नाट्य होते का?सृष्टी शुगर कंपनीला कोणी गेले आहे का?यात तालुक्याचे कुणी पार्टनर तर नाही ना?कारखाना चांगल्या माणसाच्या हातात गेला पाहिजे.पैसे मागणे हा गुन्हा आहे का?आमच्या नादी लागू नका परमेश्वर असत्यला कधीच माप करणार नाही.कृती समिती तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही नेत्यांना मात्र याचे परिणाम भोगावे लागतील संचालक मंडळाशी आम्ही चौकात खुली चर्चा करण्यास तयार आहोत त्यांनी चर्चेला यावे असे आवाहन पत्रकार परिषदेत कृती समितीचे समन्वयक एस.बी.पाटील यांनी केले.

Protected Content