प्रियांका गांधींचाही फोन हॅक करण्यात आलाय ; काँग्रेसचा खळबळजनक आरोप

PRIYANKA GANDHI

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील पत्रकार, नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअॅपवरील हेरगिरीमागे केंद्र सरकारचा हात आहे. कारण पिगॅसस सॉफ्टवेअर हे फक्त सरकारलाच विकता येते अन्य कुणाला विकले जात नाही. ज्यांचे फोन हॅक झालेत त्यांना व्हॉट्सअॅपकडून मेसेज पाठवण्यात येत आहेत. असाच मेसेज प्रियांका गांधींनाही असल्याची माहिती काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. काँग्रेसच्या या आरोपामुळे देशाच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी इस्रायलच्या पिगॅसस सॉफ्टवेअरद्वारे नेते, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअॅपवरील हेरगिरीवरून काँग्रेसने मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. व्हॉट्सअॅपवरील हेरगिरीत थेट सरकारचा हात आहे. ‘अबकी बार जासूसी सरकार’ आणि भाजपचे नवे नाव ‘भारतीय जासूसी पार्टी’ असे आता जनता बोलत असल्याचे सुरजेवाला म्हणाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पिगॅसस सॉफ्टवेअरद्वारे पत्रकार, नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन हॅक केले गेले आणि याची माहिती सरकारला होती, असा दावा सुरजेवाला यांनी केला आहे.

Protected Content