खडसे महाविद्यालयात एन. मुक्टो. स्थानिक शाखेची कार्यकारिणी गठीत

मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात एन. मुक्टो. स्थानिक शाखेची सन 2022-2023 या कालावधीसाठीची नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी डॉ. सी. ए. नेहेते तर उपाध्यक्षपदी प्रा. सौ. सी. डी. खर्चे यांची निवड करण्यात आली आहे.

एन. मुक्टो. स्थानिक शाखेची सन 2022-2023 या कालावधीसाठीची नूतन कार्यकारिणी गठित करण्यासाठी निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा. डॉ. एच. ए. महाजन यांनी काम पाहिले. बिनविरोध निवडून आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे, अध्यक्ष डॉ. सी. ए. नेहेते, उपाध्यक्ष – प्रा. सौ. सी. डी. खर्चे, सचिव – डॉ. आर. डी. येवले, सहसचिव – डॉ. पी. एस. प्रेमसागर, खजिनदार – प्रा. सौ. एस. ए. देशमुख, अंतर्गत हिशेब तपासनीस – डॉ. कु. सी. व्ही. ठींगळे, केंद्रीय प्रतिनिधी – डॉ. आर. आर. किनगे, जिल्हा प्रतिनिधी – प्रा. जी. एस. चव्हाण, महिला प्रतिनिधी – प्रा. सौ. एस. व्ही. राणे, सेवानिवृत्त प्रतिनिधी – प्रा. श्रीमती एन. ए. पाटील. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे प्र. प्राचार्य डॉ. एच्. ए. महाजन, उपप्राचार्य डॉ. ए. पी. पाटील व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.

Protected Content