यावल कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सेंद्रिय व गांडूळ शेती विषयक चर्चासत्र संपन्न

यावल, – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्यादित जळगाव संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यू. ए. सी. च्या अंतर्गत यावल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ‘सेंद्रिय व गांडूळ शेती’ या विषयावर नुकतेच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

 

सेंद्रिय व गांडूळ शेती विषयक चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त कृषी अधिकारी ए. टी. चौधरी व सेवानिवृत्त उपप्राचार्य पी. टी. चोपडे तसेच प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते. अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा. एम. डी. यांनी भूषविले. कार्यक्रमाचे आयोजक डॉ. आर. डी. पवार यांनी प्रास्ताविकात चर्चासत्र आयोजन मागील भूमिका स्पष्ट केली. ए. टी. चौधरी यांनी चर्चासत्राचे उद्घाटन करून मार्गदर्शन केले की, रासायनिक खतांचा बेसुमार वापराने जमिनीची उत्पादन क्षमता कमी झालेली आहे. जमिनीची पोत वाढविण्यासाठी शेणखत, मासळी खत, कोंबडी खत व गोमूत्र यांचा वापर करणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती ही देखील देशसेवा आहे.
दुसऱ्या चर्चा सत्रात पी. टी. चोपडे यांनी प्रतिपादन केले की, रासायनिक शेतीमुळे उत्पादनांची निर्मिती होत आहे. विषयुक्त आहार शरीरात गेल्याने विविध आजारांना आमंत्रण मिळते. शेतीत गोमूत्र, गांडूळखत, भाताची पेज, गूळ, लिंबोळी अर्क यांचा वापर करून सकस धान्य निर्मिती करणे काळाची गरज आहे. अध्यक्षीय भाषणात प्रा‌. एम. डी. खैरनार यांनी विचार व्यक्त केले की रासायनिक शेतीमुळे विपरीत परिणाम समोर येत आहेत. माणसाचे आयुर्मान निम्म्यावर आलेले आहे. कार्यक्षमता कमी झालेली असून रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली आहे तसेच कॅन्सरचे प्रमाणही वाढले आहे. याप्रसंगी मिलिंद महाजन, (कोरपावली), भुषण पाटील (विरावली), ललित महाजन (अमोदे) व अतुल तळेले (बोरखेडा) यांनी प्रश्न विचारून चर्चेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. चर्चासत्रात ४३ शेतकरी सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्र घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार प्रा. एस. आर. गायकवाड यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, डॉ. एस. पी. कापडे, डॉ. एच. जी. भंगाळे, डॉ. पी. व्ही. पावरा, मिलींद बोरघडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Protected Content