शाहु महाराज गुणवत्ता धारक पुरस्काराचे वितरण (व्हिडीओ)

पाचोरा, प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण विभागाच्या वतीने पाचोरा व भडगाव येथे शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराचे धनादेश वितरित करण्यास सुरवात केली आहे. समाज कल्याण विभागामार्फत हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.

सदर पुरस्कार अनुसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थी १० वी व १२ वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यास दिले जातात. शाळा स्तरावर ५ हजार रुपये, तालुका स्तरावर १० हजार रुपये, जिल्हास्तरावर २५ हजार रुपये, विभागीय बोर्डस्तरावर ५० हजार रुपये, बोर्ड १ लाख रुपये तर राज्य स्तरावर २ लाख ५० हजार रुपये असे स्वरुप आहे. याच अनुषंगाने पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रत्येकी ५ हजार रुपये धनादेशाचे वाटप शाळेत प्रथम आलेल्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कारांचे धनादेश समाज कल्याण विभागाचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांच्या हस्ते वितरीत करण्यात येवुन समाज कल्याण विभागाच्या शैक्षणिक योजनांची देखील माहिती देण्यात आली. यात राहुल सयाजी पवार  (गो.से. हायस्कुल पाचोरा), सोनवणे रिंकु अजय सोनवणे (तावरे कन्या विद्यालय, पाचोरा), नेहा रमेश मोची (नवजीवन विद्यालय, पाचोरा), चेतन अनिल जावळे (लोहिया विद्यालय, बांबरुड राणीचे), प्रतिक्षा दिनकर वाल्हे (न्यू इंग्लिश स्कुल, भडगाव), सानिका धर्मा पिंगळे (माध्यमिक विद्यालय अंतुर्ली बु”) या विद्यार्थ्यांना सदर धनादेशांचे वितरण समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गादर्शानाखाली वितरीत केले.

 याप्रसंगी गो. से. हायस्कुलचे मुख्यध्यापक सुधीर पाटील, पर्यवेक्षक ए. बी. अहिरे, तावरे कन्या विद्यालयाय मुख्यध्यापक एफ. एफ. पाटील, महाजन, नवजीवन विद्यालयाचे विकास पाटील, मनोज पाटील माध्यमिक विद्यालय अंतुर्ली मुख्यध्यापक राहुल जाधव, बांबरुड (राणीचे) येथील लोहिया विद्यालयाचे मुख्यध्यापक पाटील, न्यु इंग्लीश स्कुलचे वाणी, पाचोरा येथील गोवर्धन जाधव, शंकर पगारे आणि पालक उपस्थित होते.

Protected Content