शिरीष चौधरी यांच्या प्रचारास उद्यापासून प्रारंभ

shirish chaudhari

फैजपूर, प्रतिनिधी | रावेर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिरीष मधुकरराव चौधरी यांचे उद्या दि ६ रोजी सकाळी ९ वाजता फैजपूर येथील खंडोबा देवस्थान येथे प्रचारचे नारळ वाढवून प्रचाराला प्रारंभ होणार आहे.

या प्रचार प्रसंगी  माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार अरुण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रचार दौरा असा राहणार आहे दुपारी ३ ते ३.५० आमोदा, दुपारी ३.४५ ते ४.४५ बामणोद ,सायंकाळी ५ ते ५.३० कोसगाव, सायंकाळी ५.४५ ते ७ प्रचार फेरी निघेल. प्रचार नारळ व वरील गावात काढण्यात येणाऱ्या प्रचार फेरीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी तसेच पी आर पी कवाडे गट रावेर व यावल तालुका अध्यक्ष तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी यांनी केले आहे.

Protected Content