टाकळी येथे उद्या महायुतीचा विजय संकल्प मेळावा

mangesh chavhan 2

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी-शिवसेना-रिपाई-रासप-रयत क्रांती-मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार
मंगेश रमेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ उद्या रविवार (दि.६) रोजी करगांव-टाकळी प्र.चा. गटाचा विजय संकल्प मेळावा सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 

हा मेळावा टाकळी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात घेण्यात येणार असून या गटातील सगळ्या ग्रामस्थांनी आणि महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महायुतीतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content