शेंदूर्णी प्रतिनिधी | येथिल ईश्वर नगरमध्ये आज दि.१५ सकाळी १० वाजता दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पोलिस चौकीचे भूमिपूजन पहुर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सागरमल जैन,माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर बारी,शांताराम गुजर,माजी उपसरपंच पंडितराव जोहरे,पंडित दीनदयाळ पतसंस्था चेअरमन अमृत खलसे,स्नेहदिप गरूड, बिलवाडी सरपंच यशवंत पाटील,सोहन जैन,महेश भदाणे,फारूक खाटीक मनसेचे डॉ.विजयानंद कुळकर्णी, शिवसेनेचे सुनील अग्रवाल, संजय सूर्यवंशी, बारकू जाधव,जिनिंगचे संचालक राजेंद्र पवार,साई केबलचे रमेश राजपूत, पीएसआय बनसोडे,संदीप चेडे,एएसआय शशिकांत पाटील,हेडकॉन्स्टेबल प्रशांत विरणारे, होमगार्ड व नागरिक उपस्थित होते. इंजिनियर संजय कुमावत यांनी नियोजित इमारती आराखड्याविषयी माहिती दिली. लोकसहभागातून निर्माण होणाऱ्या पोलिस चौकीसाठी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी ५१ हजाराचे योगदान जाहीर केले शेंदूर्णी शहर पत्रकार संघाचे वतीने विलास अहिरे यांनी ५१००/- रुपये योगदान देण्याचे जाहीर केले बारकू जाधव यांनी संपूर्ण कामासाठी काँक्रीट मिक्सर मशीन पुरविण्याचे जाहीर केले.यावेळी सागरमल जैन यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तर अमृत खलसे यांनी गावच्या वतीने व नगरपंचायतच्या पोलिस चौकीच्या सुसज्ज इमारतींसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, पोलिस निरीक्षक धनवडे यांनी बांधकामासाठी सढळ हाताने नागरिकांना मदत करण्यासाठी आवाहन केले आहे. या वेळी सुनील गुजर यांनी आभार मानले.