काव्यरत्नावली चौकात श्री राजपूत करणी सेनेच्या वतीने रक्तादान शिबीर

जळगाव प्रतिनिधी । शहरातील काव्यरत्नावली चौकात श्री राजपूत करणी सेनेच्या वतीने बुधवार १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबाराचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते करण्यात आले.

 

याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे उपस्थित होते. कोरोनाची तिसरी लाट आली असून राज्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे वाढदिवस रक्तदान शिबिराने साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले होते. रेड प्लस ब्लड बँकचे डॉ. भरत गायकवाड, अमोल शेलार यांच्या सहकार्याने शिबीर राबविण्यात आले.  यावेळी राजपूत करनी सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंग मोरे, खान्देश कार्यध्यक्ष विलाससिंग पाटील, शिवसेनेचे भरत देशमुख, पत्रकार दीपक सपकाळे, समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, दिलीप पाटील, बापुसिंग राणा, बी. एच. खंडाळकर, गणेश राणा यांची उपस्थिती होती.तर रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड बँकेचे व सहकारी रवींद्र पाटील, दीपक पाटील, सुरज पाटील, प्रमोद पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी १०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!