जळगाव ग्रामीण तालुका कॉंग्रेस कमिटीतर्फे संविधान दिन साजरा

WhatsApp Image 2019 11 26 at 16.51.56

जळगाव, प्रतिनिधी | भारतीय राज्यघटनेच्या सहासष्ट्व्या वर्धापनदिनानिमित्ताने कॉंग्रेस भवनात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

आज जळगाव (ग्रामीण) तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करुन संविधान प्रतीचे वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी जळगाव (ग्रामीण) तालुका अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी, मनोज वाणी, दिपक सोनावणे, शशी तायडे, ललित पाटील, हर्षल पाटील, गणेश सरोदे, रवि सोनावणे, संजय पाटील ,तुषार राणे व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content