माझी वसुंधरा अभियान : शेंदुर्णी नगरपंचायतीची विशेष दखल

शेंदुर्णी, ता. जामनेर, विलास पाटील । येथील नगरपंचायतीने माझी वसुंधरा या अभियानात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची राज्याच्या पर्यावरण मंत्रालयातर्फे विशेष दखल घेण्यात आली आहे.

शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. याची दखल आज राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने घेऊन त्यांचा विशेष उल्लेख केला आहे. माझी वसुंधरा अभियानाच्या फेसबुक पेजवर आज खालील प्रमाणे कौतुकाचे शब्द काढून शेंदुर्णी नगरपंचायतीचा गौरव करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की-

🌳 या आठवडयातील रविवारचे आपले मानकरी आहेत 🌳
(1) नगर पंचायत शेंदुर्णी, जिल्हा जळगांव.
(2) सौ. विजयाताई अमृत खलसे, नगराध्यक्षा, नगर पंचायत शेंदुर्णी.
(3) श्री. साजिद पिंजारी, मुख्याधिकारी, नगर पंचायत शेंदुर्णी.

🌿 शेंदुर्णीची पर्यावरण पूरक शहराकडे वाटचाल 🌿

▪️ शहराचे हरित अच्छादान वाढविण्याच्या दृष्टीने 1520 भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन व संवर्धन करण्यात येत आहे.

▪️ अभियान काळापूर्वी लावलेल्या 700 वृक्षांचे संगोपन करण्यात येत आहे.

▪️ हरित क्षेंत्राचा विकास या संकल्पनेतून 3 ठिकाणी उद्यान विकसीत करण्यात येत आहेत.

▪️ इलेकट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ई व्हेईकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्प अंतर्गत शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरण पूरक वाहनांच्या वापराबाबत जनजागृती करण्यात आली.

▪️ शहरात ई व्हेईकलसाठी 3 चार्जिंग पॉइंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

▪️ प्रदूषण कमी करण्यासाठी आठवड्याचा दर मंगळवार नो वेहिकल डे पाळण्यात येतो.

▪️ शहरात विविध ठिकाणी सायकल रॅली घेण्यात आली यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

▪️ सोलर वापरणाऱ्या नागरिकांना पर्यावरण पूरक ऊर्जेचा वापर करणेकरिता प्रोत्साहित करण्यात येते. यात शहरात ६ कारखाने हे १००% सोलर उर्जेवर चालतात.

▪️ जुने वीज दिवे बदलून त्या जागी 1566 LED दिवे बसविण्यात आले.

▪️ जलसंधारणसाठी पाण्याचा प्रवाह पारंपारिक पध्दतीने आडवून उपलब्ध साधनांचा (सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळू इ.) वापर करुन बंधारा बांधलेला आहे.

▪️ नदी नाले स्वच्छता, रेन वॉटर हारवेस्टिंग बंधनकारक करणेसारखे उपक्रम राबविण्यात आले. शहरात 30 हून अधिक नागरिक रेन वॉटर हारवेस्टिंग व परकोलेशन चा वापर करीत आहे.

▪️ वायू गुणवत्ता तपासणी : मान्यता प्राप्त प्रयोगशाळां कडून दोन वेळेस रेसिडेंशियल, कमर्शियल व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अशा 3 ठिकाणी वायूची गुणवत्ता तपासण्यात आली असून तपासणीचे सकारात्मक अहवाल प्राप्त झाले आहेत.

▪️ माझी वसुंधरा अभियानाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी शहरात विविध ठिकाणी पथनाट्यव्दारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. शहरातील भिंतींना विविध आकर्षक रंगांनी व चित्रांनी सजवून माझी वसुंधराच्या अनुषंगाने पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला जात आहे.

▪️ #Epledge अंतर्गत माझी वसुंधरा मित्र परिवार सदस्यांची संख्या एकूण 3,000 पेक्षा अधिक

Protected Content