राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने फेस शिल्डचे वाटप

शेंदूर्णी, प्रतिनिधी । आज राष्ट्रवादी सोशियल वेलफेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे वतीने जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी व वाकोद येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिसन्सचे सर्व नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आले.

फेस शिल्ड वाटप कार्यक्रमाच्या सुरवातीला संजय गरुड,डॉ. प्रशांत पाटील यांनी या उपक्रमाची माहिती दिली. शेंदूर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल निकम यांनी राष्ट्रवादी सोशियल वेल्फेअर ट्रस्ट व डॉक्टर सेल तसेच संजय गरुड यांचे या उपक्रमाबद्दल विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाचे नियोजन जामनेर राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. उद्या बेटावद,फत्तेपुर, वाकडी या प्राथमिक आरोग्य केंद्रांना फेस शिल्ड वाटप करण्यात येणार आहेत. तालुक्यातील उर्वरीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना सुद्धा दोन दिवसात या फेस शिल्डचे वाटप करण्यात येणार असून या आधीही जामनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना २०% सोडीयम हायपलोक्लोराईड व पीपीई किटचे वाटप करण्यात आले आहे. सद्या राज्य कोरोना विषाणू प्रादुर्भाव व संक्रमण या विषयीवर लढत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी सोशियल वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून डॉ. सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जळगाव जिल्हा व जामनेर तालुका राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने आज जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी,वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या ६० गावांतील ए. एन.एम, एम.पी.डब्ल्यू व आशा सेविका यांना शिल्डचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड यांच्या हस्ते करण्यात आले. शेंदूर्णी येथे किट वाटपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन पाटील, जामनेर तालुका डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, डॉ. राहुल निकम,डॉ.संदीप पाटील, जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, माजी प.स.सदस्य डॉ.किरण सुर्यवंशी, फारूक खाटीक, श्रीराम काटे, आनंदा धनगर, विलास पाटील, जामनेर शहराध्यक्ष जितेश पाटील, युवक अध्यक्ष शैलेश पाटील, डॉ. विजय राठोड, डॉ.महेंद्र बोरसे ,डॉ.स्वप्नील संघवी, डॉ. अतुल पाटील, जैन,गजानन धनगर, अजय निकम, विलास जोशी,राजू जेटलमन,योगेश पाटील,अर्जुन पाटील उपस्थित होते..

Protected Content