मोबाइलमध्ये गेम न खेळू दिल्याने मुलाची आत्महत्या

रावेर प्रतिनिधी । कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले असून नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे घरात बसून लोक टीव्ही किंवा मोबाइलमध्ये व्यस्त असतात. अशातच रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथे आईने मोबाइलमध्ये गेम न खेळू दिल्याच्या रागावरुन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

मुंजलवाडी (रावेर)  येथील संजय अशोक सूरदास वय वर्ष 16 वर्ष  हा घरात मोबाईलवर गेम खेळत असताना त्याच्या आईने मोबाईलवर नेहमी खेळत राहतो काही कामधंदा कर असे म्हटले असता त्याचा मनात राग आला आई शेतात गेली व शेतातून येऊन आंघोळ करीत असताना सजंय  मृतकाने घरातच गळफास घेतला ग्रामीण रुग्णालय रावेर येथे दाखल केले असता मरण पावलेल्या होता 174 crpc प्रमाणे दाखल करून पुढील चौकशी हे कॉ सानप करीत आहे.

Protected Content