जळांद्री येथे विना परवानगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील जळांद्री येथे पुर्वपरवानगीशिवाय रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती आश्‍वारूढ पुतळा बसविण्यात आला. याबाबत माहती मिळताच पहूर पोलिसांनी जळांद्री गाठून ग्रासभा घेत परवाणगी घेण्याबाबत सुचना केली. तोपर्यंत पुतळा काढण्याबाबत सुचना करताच पुतळ्याची जबाबरी घेण्यास सर्व ग्रामस्थ सरसावले. त्यामुळे हतबल होऊन ग्रामस्थांची विणवणी करण्याची वेळ पोलिस प्रशासनावर आली.

जळांद्री ग्रामपंचायतीसमोरील खुल्या व मोक्याच्या जागी शुक्रवारी मध्यरात्री ग्रामस्थांनी शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा आणून बसवीला. याबाबत शनिवारी पोलिस प्रशासनाला माहिती मिळाली. रविवार ता. ८ रोजी सायंकाळी पाच वाजेला महिला दिनानिमित्त ग्रामसभा होती. त्याचवेळी ग्रामस्थांनाही पाचारण करून पोलिस उपनिरिक्षक किरण बर्गे यांनी पुर्वपरवानगीशिवाय शिवाजी महाराजांचा पुतळा बसवीता येणार नाही. तुम्ही परवानगी आणा आम्ही सहकार्य करू. आतापर्यंत प्रत्येक जातीधर्माच्या कायर्क्रमांस आम्ही सहकार्यच केले आहे. मात्र महाराजांचा पुतळा स्थापनेसाठी परवानगी घ्या. तोपर्यंत पुतळा सुरक्षीत ठिकाणी ठेवावा लागेल. अशी सुचना केली. मात्र ग्रामस्थांनी पुतळा काढण्यास विरोध दर्शवीताच काही गैरकृत्य झाल्यास जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्‍न किरण बर्गे यांनी उपस्थीत केला. असा प्रश्‍न उपस्थीत होताच बाळू विठ्ठल पाटील हे मंचावर आले, त्यांनी पुतळ्याची जबाबदारी घेणार्‍यांनी हात उंच करण्याचे आवाहन केले. बाळू पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही जबाबदारी घेतो म्हणत उपस्थीत असलेले सर्वच ग्रामस्थ उठून उभे राहिले. ग्रामस्थांची एकी पहाता पोलिस प्रशासनाला एक पाऊल मागे घ्यावे लागले. परवानगी येईपर्यंत वरिष्ठांकडून काही आदेश आल्यास आम्हाला त्या पध्दतीने कार्यवाही करावी लागेल, असे पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राकेशसिंग परदेशी यांनी स्पष्ट केले. तर लवकरात लवकर ठराव करून घ्या व पुरवानगीची प्रक्रीया पुर्ण करा. अशा सुचनाही यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक परदेशी यांनी दिल्या. यावेळी सरपंच चांगो पाटील, ग्रामसेवक अमोल देशमुख, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थीत होते.

Protected Content