राष्ट्रवादीतर्फे राज्यपाल कोश्यारी, भाजपा प्रवक्ते त्रिवेदी यांच्या राजीनाम्याची मागणी

यावल –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्याचा निषेध करत राजीनामयाची मागणी तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्व. निखील खडसे यांच्या बद्दल केलेल्या निंदनिय विधानाचा राष्ट्रवादी पक्षातर्फे तहसीलदार महेश पवार यांना निवेदनाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपाहार्थ व अपमानकारक वक्तव्य आणि राज्याचे ग्रामविकास गिरीश महाजन यांनी निखिल खडसे यांच्या बद्दल निंदनिय विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यपालांचा व प्रवक्ते त्रिवेदी यांचा राजीनामा घेवुन मंत्री गिरीष महाजनांवर कायद्याशीर कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार महेश पवार यांना दिले आहे.  याबाबत यावल तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज तहसीलदार महेश पवार यांना दिलेल्या निवेदनात राज्यपाल भगतसिंग कोशियारी व भाजपाचे प्रवक्ते सुंधाशु त्रिवेदी यांनी देशाचे प्रेरणास्थान व सर्व शिवप्रेमींची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य  केल्याने संपुर्ण शिवप्रेमींची भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करीत या दोघांचे राजीनामे घ्यावे अशी मागणी केली असून तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्हा दुध संघाची निवडणुक डोळया समोर ठेवुन राष्ट्रवादीचे जेष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांच्या एका दुदैवी घटनेत आत्महत्याने मृत्यु पावलेल्या घटनेचे राजकारण करीत केलेल्या विधानाचा ही जाहीर निषेध नोंदविला आहे. अशा प्रकारे खालच्या पातळीचे वक्त्व्य करणाऱ्या महाजनांचा पक्षाच्या वतीने धिक्कार करण्यात येवुन त्यांच्याविरुद्ध कायद्याशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी प्रा . मुकेश येवले , एम. बी. तडवी, अॅड. देवकांत पाटील, मो .आबिद कच्छी, अरूण लोखंडे, कामराज घारू, सरदार तडवी, किशोर माळी, प्रकाश पारधे, फिरोज तडवी, किरण पाटील, गजानन राजपुत, भुरेलाल पावरा, पिंताबर महाजन, नरेन्द्र कोळी, राहुल चौधरी, पवन पाटील, निसार तडवी, नानासिंग बारेला, भैय्या बारेला यांच्यासह मोठया संख्येत राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.

 

Protected Content