Home Cities जळगाव विवेकानंद नगरात काँक्रीट रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन (व्हिडिओ)

विवेकानंद नगरात काँक्रीट रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन (व्हिडिओ)

0
53


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील विवेकानंद नगरातील साईबाबा मंदिर ते जैन बोर्डिंग पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

नगरसेवक धीरज सोनवणे यांच्या प्रयत्नातून आ. राजूमामा भोळे यांच्या स्थानिक आमदार निधीतून साईबाबा मंदिर ते जैन बोर्डिंग काँक्रीट रस्ता तयार करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन विवेकानंद नगरातील साईबाबा मंदिराजवळ आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी साईबाबा यांचे दर्शन घेतले. याप्रसंगी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमा भोळे, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, भाजपा गटनेते भगत  बलाणी, विशाल त्रिपाठी, नगरसेवक धिरज सोनवणे, नगरसेविका अॅड. शुचिता हाडा, मंगला चौधरी, धीरज वर्मा यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/761476604880266

 


Protected Content

Play sound