Home क्राईम अज्ञात कारच्या धडकेत वयोवृद्ध जखमी

अज्ञात कारच्या धडकेत वयोवृद्ध जखमी

0
125


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रामदेववाडी बसस्थानकाजवळ ६५  वर्षीय वयोवृद्धाला कारने धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान गबरू चव्हाण वय-६५ रा. रामदेववाडी ता. जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. बुधवारी २८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता गावातील बस स्थानकाजवळ ते उभे होते. त्यावेळी बाजूला उभी असलेल्या अज्ञात कालचालकाने कार मागे घेत असताना भगवान चव्हाण यांना धडक दिली. या धडकेत भगवान चव्हाण हे जखमी झाले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार व दाखल करण्यात आले. शुक्रवार २९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.


Protected Content

Play sound