आषाढीनिमित्त शेगाव नगरीत फुलला भक्तीचा मळा ! ( व्हिडीओ )

shegaon bhakt

खामगाव अमोल सराफ । विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या शेगाव मध्ये आज आषाढी एकादशी निमित्त संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी जमली आहे.

तर जे पंढरपूर ला जावू शकत नाहीत, त्यांनी संत गजाननांच्या नगरीत येवून महारांजाचे दर्शन घेतलेय भाविकांच्या म्हणण्यानुसार या दर्शनाला पंढरपूर च्या विठ्ठलाच्या दर्शनाचेच महत्व असल्यामुळे आज आषाडी निमित्ताने संत नगरी शेगावात लाखो भक्तांची मांदियाळी जमली होती. राज्यातून लाखो भाविक शेगावात दाखल झाले होते .म्हणूनच शेगाव ला प्रति पंढरपूर म्हणून ही ओळखल्या जातेय ….

श्री संत गजानन महाराजांच्या शेगाव मध्ये पारंपरीक पालखी सोहळा पार पडला. यामुळे संपूर्ण पंढरीच अवतरली की काय असे दृश्य वाटत होते. आषाढी निमित्त जे भाविक पंढरपूर ला जाऊ शकत नाहीय त्या भाविकांनी शेगाव ला येऊन गजानन बाबांचे दर्शन घेतले. यामुळे गण गण गणात बोतेच्या गजरात शेगाव नगरी दुमदुमली होती. एकीकडे शेगावचे गजानन बाबांचे मंदिर, भजन, कीर्तन व हरिनामाने भक्ती ने न्याहुन निघाला होता तर दुपारी अश्‍व , गज ,टाळ, मृदुन्ग च्या गजरात पालखी ची नगर परिक्रमा निघाली होती त्यात लाखो भाविक सहभागी झाले होते.

गजानन महाराजांनी पंढपुरात भक्त बापू काळे यांना पाटील यांच्या वाड्यात (मठात) विठ्ठल रूपात दर्शन दिले होते. तेव्हापासून जे भक्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यास पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते भक्त सरळ गजानन महाराजांच्या पंढरीत येऊन गजानन महाराजांना विठ्ठल रूपात पाहून नतमस्तक होतात. नाम विठ्ठलाचे घ्यावे, पाऊल पुढे टाकावे… गण गण गणात बोते, हे भजन श्री हरीचे…. तर दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे असे म्हणणे आहे की, ते बर्‍याच वर्षापासून येत असून घरात सुख शांती राहते , गजानन बाबांचे नाव घेतले कि ,कोणतेही काम पटकन होते. यामुळे येथे आषाढी एकादशीला लाखो भाविकांची गर्दी उसळले. आजदेखील लाखो भाविक शेगाव नगरीत दाखल झाले असून संस्थानतर्फे अतिशय अचूक नियोजनाने परिपूर्ण असणारी सुविधा पुरविण्यात आली आहे.

पहा : शेगाव नगरीतील आषाढी एकादशीच्या चैतन्याचा व्हिडीओ.

Protected Content