प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची आढावा बैठक

aathava baitjhak

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली गावात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आढावा तसेच शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी महसुल प्रशासनाच्या माध्यमातुन आज आषाढी एकादशीनिमित्ताने सुटी असल्यावर देखील आढावा बैठक घेण्यात आली.

यासंदर्भात येथील महसुल प्रशासनाच्यावतीने मिळालेल्या माहीतीनुसार आज (दि. १२ जुलै) रोजी दुपारी १२ वाजता विरावली ग्राम पंचायतच्या कार्यालयात यावलचे निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांच्या प्रमुख उपस्थित शासनाची शेतकरी बांधवांसाठी लागु केलेल्या महत्वपुर्ण प्रधानमंत्री विकास सन्मान योजनेव्दारे दिल्या जातात. त्याच अनुदाना संदर्भातील लागणारे विविध कागदपत्रांची जुळवाजुळवी करण्यासाठी तालुक्यातील फैजपुर विभागाचे प्रांत आधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जितेन्द्र कुंवर, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांच्या व प्रत्येक विभागातील मंडळ अधिकारी तसेच तलाठी, कृषी सहाय्यक, व ग्रामसेवक यांच्या सहकार्यातुन युद्धपातळीवर मोहीम राबवली जात आहे.  या मोहिमेव्दारे विरावली गावात दवंडी देवुन प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेव्दारे मिळणाऱ्या योजनेचा प्रत्येक शेतकरी बांधवाने लाभ घ्यावा. यासाठी निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, मंडळ अधिकारी बी.एम.पवार, कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी बि.के. माचले व कृषी सहाय्यक मानिषा तायडे यांच्या उपस्थितीत योजनाची माहिती शेतकरी व त्यांच्या कुटुंबास अवगत करून देण्यात आली. शासनाच्या नवीन आदेशान्वयेनुसार या योजनेत सर्व शेतकरी कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी सामाईक खात्यातील जमीन जो शेतकरी प्रत्यक्ष कसत असेल अशा शेतकरी बांधवाचे कुटुंब या योजनेचे लाभ मिळण्यासाठी पात्र असेल, त्यामुळे सामाईक खात्यातील शेतकरी बांधवांनी आपले शेती गट क्रमांक, बँक खाते बुक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक अशी आवश्यक कागदपत्रे गावातील तलाठी अथवा मंडळ अधिकारी यांच्याकडे तातडीने जमा करावी अशा सुचनाचे मार्गदर्शन यावेळी शेतकरी बांधवांना करण्यात आले आहे.

विरावली ग्राम पंचायतच्या सभागृहात झालेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या आढावा बैठकीत शेतकरी बांधव महिला व त्यांचे कुटुंब मोठया संख्येने उपास्थित होते. यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांचे खाते व इतर कागदपत्रे जमा करण्यात कृषी सहाय्यक मनीषा तायडे यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांनी केले.

Protected Content