राज्यस्तरीय आंतरजिल्हा चौदावर्षाखालील मुलींची फुटबॉल स्पर्धेचे उपउपांत्य सामने संपन्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यस्तरीय आंतर जिल्हा चौदा वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत मुंबई, पुणे,कोल्हापूर व नागपूर या जिल्ह्यांनी मजल मारली असून गुरुवारी दुपारच्या सत्रात मुंबई विरुद्ध पुणे (३.३० वा) व कोल्हापूर विरुद्ध नागपूर( ४.३०) असे सामने रंगणार आहेत.  कोल्हापूर विजयी विरुद्ध पालघर ७ -२, मुंबई वी वी धुळे १२ – ०, पुणे वी वी जळगाव ७-०, नागपूर वी वी यवतमाळ १-० असा उपउपांत्य फेरीचे सामन्याचा निकाल लागला. आर्या (पालघर), प्रिक्षा पटेल (धुळे) सिद्धी ठाकरे (जळगाव) जानव्ही पाटील (यवतमाळ) हे उत्कृष्ट खेळाडू ठरले.

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिक देण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर पाच स्वर्ण पदक विजेता पोलीस दलातील संतोष सुरवाडे, अनुभूती शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी, मनपा जळगावच्या उपायुक्त निर्मला गायकवाड व वैष्णवी गायकवाड, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील व आयशा खान यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. भूषण पंगेरकर, नंदन वाघमारे, सागर सोनवणे, राजेंद्र सावंत, सलीम पारकोटे व गुलाबशा अन्सारी (सर्व मुंबई) एनी पॉल नागपूर, शलाका जामदार कोल्हापूर, डॉ लियाकत अब्बासी (पहुर) डॉ श्रुती रूपारेलिया, डॉ खुशबू कटारिया, डॉ स्नेहा तिवारी (सर्व गोदावरी मेडिकल कॉलेज जळगाव) यांचा सन्मान करण्यात आला. अनुष्का पंडित, खुषी सोलंकी, रंजना खुशावा, साक्षी घोसाळकर, सिद्धी शेळके, सय्यद अब्दुल रहमान, मृणाल शामकुमार, सौरभ चेके, अभय साळवे, ऋषिकेश दाभाडे, अथर्व गवळी व अभिषेक सोनवणे या सर्व पंचांचे सुद्धा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Protected Content