अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आर.एल. हॉस्पिटल समोर दुचाकी घसरल्याने खोटे नगर येथील ३४ वर्षीय तरूण हा जखमी झाल्याची घटना घडली होती. खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना मंगळवारी ५ मार्च रोजी रात्री १० वाजता मृत्यू झाला आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल गोपाल पाटील वय ३४ रा. खोटे नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील खोटे नगर येथे अनिल गोपाल पाटील हा तरूण हा आईवडी यांच्यासोबत वास्तव्याला होता. खोटे नगर येथे सायबर कॅफे चालवून तो उदरनिर्वाह करत होता. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता अनिल पाटील दुचाकीने जळगाव शहरात जात असतांना राष्ट्रीय महामार्गावरील आर.एल. हॉस्पिटलसमोर दुचाकी घसरल्याने ते गंभीररित्या जखमी झाला होता. त्यांला तातडीने शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होता. त्याच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी ५ मार्च रोजी रात्री १० वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई मिराबाई, वडील गोपाल शिवराम पाटील आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Protected Content