Home क्राईम कौटुंबिक वादातून विवाहितेला मारहाण

कौटुंबिक वादातून विवाहितेला मारहाण

0
94


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या विवाहितेला किरकोळ व घरगुती कारणावरून पतीने दारूच्या नशेत येवून मारहाण केली. तर सासू आणि दीर यांनी देखील शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात मंगला मुकेश निकाळजे वय २३ या विवाहिता आपले पती, सासू आणि दीर यांच्यासोबत वास्तव्याला आहे. घरातील किरकोळ कारण व कौटुंबिक वादातून मंगला निकाळजे यांना पती मुकेश निकाळजे याने दारूच्या नशेत येवून मारहाण करून दुखापत केली. तर सासू हिराबाई रघुनाथ निकाळजे आणि दीर सुरेश रघुनाथ निकाळजे यांनी देखील शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना घडल्यानंतर विवाहितेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता पती मुकेश रघुनाथ निकाळजे, सासू हिराबाई रघुनाथ निकाळजे आणि दीर सुरेश रघुनाथ निकाळजे याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार हे करीत आहे.


Protected Content

Play sound