जळगावात घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । घराच्या कंपाऊंडचे कुलूप तोडून दुचाकी लांबवल्याची घटना गुरुवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. एसएमआयटी कॉलेज परिसरातील मुक्ताईनगरात ही घटना घडली.
निलेश यशवंत देसले (रा.एसएमआयटी कॉलेज परिसरातील मुक्ताईनगर) यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १९ एवाय ५६९२) चोरीस गेली आहे. देसले कुटंुबिय बुधवारी रात्री १२ वाजेनंतर झोपले होते. गुरुवारी सकाळी सात वाजता त्यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये उभी केलेली दुचाकी चोरीस गेल्याचे आढळुन आले. दसले कुटंुबियांनी चौकशी केली असता चोरट्यांनी कंपाऊंडचे कुलूप तोडून फेकलेले दिसून आले. या प्रकरणी निलेश देसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरूषोत्तम वागळे तपास करीत आहेत.

Protected Content