धरणगाव येथील माळी समाज पंच मंडळाला संत सावता गौरव पुरस्कार जाहीर

 

 

धरणगाव, प्रतिनिधी । संत सावता महाराज यांच्या प्रेरणेने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय समाज प्रबोधन कार्य करून समाजाला दिशा देण्याचे महान कार्य करणाऱ्या संस्था संघटना,महिला मंडळे, पंच मंडळे यांना क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती सप्ताह निमित्त संत सावता गौरव पुरस्कार देण्यात येतो हा पुरस्कार धरणगाव येथील माळी समाज पंच मंडळाला संत सावता गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

धरणगाव येथील क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ(मोठा माळी वाडा) ला नाशिक विभागीय संत सावता गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.  महात्मा फुले जयंती सप्ताह निमित्त रविवार १२ एप्रिल रोजी राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले सभागृह क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था अमळनेर येथे सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्था व क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंचतर्फे साय.४ वाजता नाशिक विभागीय,जिल्हास्तरीय,तालुकास्तरीय संत सावता गौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. धरणगाव पंच मंडळ(मोठा माळी वाडा) ला स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन नाशिक स्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  पुरस्कारासाठी कोणतेही प्रस्ताव मागविला नसून प्रत्यक्ष चौकशी करून माहिती गोळा करून सदर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पंच मंडळ पदाधिकारी समस्त समाज बांधवांच्या पुढाकाराने संत सावता महाराज वर्षभर विविध सामाजिक धार्मिक कार्येक्रम सप्ताह होतात. या कार्याची दखल घेतली गेल्याने समस्त विश्वस्त मंडळ समाज बांधव माता भगिनी सावता भक्त यांचा हा सन्मान आहे असे धरणगाव पंच मंडळाचे अध्यक्ष विठोबा नामदेव महाजन यांनी पुरस्कार जाहीर झाल्याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्थेचे अध्यक्ष प्रविण बी.महाजन यांनी जाहीर केलेले पुरस्कार निश्चितच समाजाला दिशा देणारे आहेत.पुरस्काराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content