फैजपूर येथे स्व. पंकज महाजन यांच्या स्मृतीदिनानिमित्त कृषि साधना पुरस्कारचे वितरण

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कृषि विज्ञान केंद्र पालच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त्त आणि स्व. पंकज महाजन यांच्या स्मृतीदिनानिमित्त फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या सभागृहात आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ‘कृषि साधना पुरस्कार २०२२’ वितरीत करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, अधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अधिक उत्पन मिळविण्यासाठी युवा शेतकऱ्‍यांनी प्रयत्न करावेत असा मानस केला. या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून डॉ.सी.व्ही.पुजारी (प्रमुख शास्त्रज्ञ केळी संशोधन केंद्र जळगाव) यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शेतक-यांचे अभिनंदन केले व अधुनिक केळी लागवड बाबत विचार व्यक्त केले. या वर्षाचे स्व. पंकज महाजन कृषी साधना पुरस्कार गोविंदा सोनवणे (रा.निंभोरा ता.रावेर) व रमेश बोबडे (कु-हा पानाचे ता. भुसावळ) यांना प्रदान करण्यात आले. त्याच प्रमाणे कृषि विज्ञान केंद्राच्या वर्धापन दिना निमित्त अमोल गणेश पाटील (रा. के-हाळे ता. रावेर), व ललीत अशोक पाटील (रा. उदळी ता. रावेर) यांचा शॉल पुष्पगुच्छ गौरव चिन्ह व गौरव पत्र पाच हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना गोविदा सोनवणे म्हणाले की, नविन संशोधनातून कृषि माल या क्षेत्राचा प्रक्रिया युक्त उत्पादन करण्यासाठी संस्था व शासनाने प्रयत्न करावा. त्याच प्रमाणे श्री रमेश बोबडे व अमोल पाटील यांनीही आपले अनुभव कथन केले. या कार्यक्रमास प्रभात चौधरी, लीलाधर चौधरी, संजीव महाजन, सुनील कोंडे, डॉ.पी.आर. चौधरी, सुधाकर झोपे, आर. एल्.चौधरी, जावेद जनाब, आर.के.चौधरी, विजय महाजन, दीपक धांडे, अजित पाटील, कुरबान तडवी, विकास गिते, रमेश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्थाविक महेश महाजन (वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) यांनी केले. तर सुत्र संचालन वैभव पाटील (पदवीधर शिक्षक पाल) यांनी केले. व अतुल पाटील (शास्त्रज्ञ के.व्ही.के पाल) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. धिरज नेहेते, सुधाकर झोपे, गोविंदा अत्तरदे, व कृषि विज्ञान केंद्राती कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले.

Protected Content