आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबध्द – आ. हरीभाऊ जावळे

yawal 2

यावल प्रतिनिधी । सातपुड्याच्या कुशितील आदिवासी हे खऱ्‍या अर्थाने वनाचे मालक आहेत. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे सांगून काही आदिवासींना जातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी होत असलेला त्रास होवू नये यासाठी प्रयत्नशिल असल्याचे आमदार हरीभाऊ जावळे यांनी सांगीतले.

येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आयोजीत आदिवासी दिनानिमीत्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्पस्तरीय अध्यक्षा मीना तडवी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरीश चौधरी, लोकसंघर्षच्या प्रतीभा शिंदे, जि.प.चे गट नेते प्रभाकर सोनवणे, प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांचेसह अनेक मान्यवर व्यासपिठावर उपस्थीत होते.

येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीन आदिवासी दिनानिमीत्ताने आदिवासी अस्मीता दिन उत्साहात साजरा केला. या निमीत्ताने निमंत्रीत विविध आदिवासी संघटना, यांनी पारंपारीक वेशभुषेसह पारंपारीक वाद्य व नृत्य करीत येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापासून सुमारे एक क़ि मी. अंतरावर असलेल्या धनश्री चित्रमंदिरापर्यंत पारंपारीक वेषज्ञुषेसह पारपारीक वाद्य व नृत्य करीत रॅली काढण्यात आली. शहरात संततधार पाउस सुरू असतांनाही आदिवासी वाद्याच्या गजरात नृत्य करण्यात मग्न होते. भर पावसातही त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आमदार जावळे, प्रकल्पस्तीय अध्यक्षा मीना तडवी,जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी हीरवी झेंडी दाखवत रॅलीस सुरवात झाल्यांनतर शहरातील चोपडा रोड, भुसावळ टि पॉर्इंट, फालक नगर, भुसावळ नाका, बोरावल दरवाजा मार्गे रॅली चित्रमंदिरात आली. त्यांनतर सभेस सुरवात झाली.

याप्रसंगी लोकसंघर्षच्या नेत्या प्रतीभा शिंदे यांनी आदिवासी संस्कृती कथन करतांना त्यांची देव-देवता, आदिवासी क्रातीकारक बिरसा मुंडा, झलकारी देवी यांचेसह एैतीहासीक क्रांतीकारक, सण, उत्सव, परंपरा, वेषभुषा याबाबत सविस्तर माहीती देवून आदीवासींच्या अडचणी कथन करत शासनाने त्या त्वरीत सोडवाव्या असे असे सांगीतले. कार्यक्रमात माजी आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले, प्रकल्प स्तरीय नियोजन आढावा समितीच्या अध्यक्षा मिना राजु तडवी आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेशाध्यक्ष एम. बी. तडवी, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे ,यांचेसह मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले.

व्यासपिठावर नगराध्यक्षा सुरेखा कोळी, प्रकल्पस्तरीय अढावा समिती सदस्य प्रज्ञा जितेद्र सोनवणे, सामाजीक कार्यकर्ते दिपक नागरे, आलीशान तडवी, नगसेविका नौशाद तडवी,हुसेन तडवी, जामन्या येथील सरंपच भरत बारेला, राहुल तायडे, हिरालाल चौधरी, उज्जैनसींग पाटील, विलास चौधरी, दिलीप सुर्यंवंशी, उपजिल्हाधिकारी राजपुत, सायबु तडवी, सर्फराज तडवी, रमजान तडवी, किशोर कुळकर्णी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी केले. उपस्थितांचे आभार आदीवासी निरीक्षक अविनाश शिवरामे यांनी मानले.

Protected Content