ग्रामपंचायत प्रशासक म्हणून सेवानिवृत्त सैनिकांना प्राधान्य द्या : विजय सपकाळे यांची मागणी

शेअर करा !

जळगाव, प्रतिनिधी ।  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूक घेणे शक्य नसल्याने ग्रामविकास खात्याने अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करतांना सेवानिवृत्त सैनिकांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी जळगाव जिल्हा सेवानिवृत्त सैनिक असोसिएशन अध्यक्ष विजय मंगा सपकाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

store advt

 

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची मुदत संपली  असून मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेथे निवडणूक घेणे शक्य नसल्याने ग्रामविकास खात्याने अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासक नियुक्त करतांना सेवानिवृत्त सैनिकांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी जळगाव जिल्हा सेवानिवृत्त सैनिक असोसिएशन अध्यक्ष विजय मंगा सपकाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सेवानिवृत्त सैनिक हा अतिशय शिस्तप्रिय व उत्तम प्रशासकीय कामांची जाण असलेला सैनिक असतो. देशहीत, ग्रामहीत ही संकल्पना त्यांच्या रक्तात बिंबलेली असते. मुळात ग्रामपंचायती म्हणजे ग्रामीण राजकारणाचा मोठा अड्डा असतो. ग्रामविकास सोड्न स्वविकास या एकाच हेतुने ग्रामपंचायतीकडे बघीतले जाते. दरम्यान सदर नियुक्ती ही, जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते करावी, असे म्हटले आहे. म्हणजेच राजकीय हस्तक्षेप होणार. अशा परिस्थितीमध्ये देशसेवा केलेल्या प्रामाणिक, ईमानदार, शिस्तप्रिय सेवानिवृत्त सैनिकांना प्रशासक म्हणून नेमणूक द्यावी, ही बाब आपल्यामार्फत शासन दरबारी त्वरीत पाठवावी अशी विनंती श्री. सपकाळे यांनी केली आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!