वाडी शेवाळे येथे प्रौढ पाचोरा रेल्वे स्थानकातून बेपत्ता

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वाडी शेवाळे येथील 52 वर्षीय प्रौढ पंढरपूरला जाण्यासाठी पाचोरा रेल्वे स्थानकावरून रेल्वेत चढली. मात्र, 19 दिवस उलटूनही वडील सापडत नसल्याने लोहमार्ग दुरक्षेत्रात मुलाच्या फिर्यादीवरून वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, लोहमार्ग पोलीस बेपत्ता इसमाचा शोध घेत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बापु तुकाराम शिंपी (वय – ५२) रा. वाडी शेवाळे ता. पाचोरा यांना पंढरपुर जायचे असल्याने बापु शिंपी यांना सोबत घेऊन त्यांचा मुलगा योगेश बापु शिंपी यांनी पाचोरा येथील रेल्वे स्थानकावरुन पाचोरा ते पंढरपुर असे रेल्वेचे जनरल टिकिट काढुन दिले. दरम्यान योगेश शिंपी यांना त्यांचा मित्र शरद विश्वास पाटील हा रेल्वे स्थानकावर भेटला. योगेश शिंपी व शरद पाटील हे बापु शिंपी यांच्या सोबत पाचोरा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर अमरावती पंढरपुर एक्स्प्रेसची वाट पाहत थांबले असता सदर गाडी दि. १२ जुलै २०२२ रोजी रात्री पावणे आठ वाजता पाचोरा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर योगेश शिंपी व शरद पाटील यांनी बापु शिंपी यांना गाडीच्या मध्यभागी असलेल्या बोगीत बसविले.

बापु शिंपी हे मोबाईल वापरत नसल्याने त्यांचेकडे प्रवासात मोबाईल नव्हता व जातांना बापु शिंपी यांनी योगेश यास सांगितले होते की, ते पोहचल्यावर फोन करतील असे सांगुन रेल्वे ही पंढरपुर च्या दिशेने निघाली. व रेल्वे मधुन बापु शिंपी हे पंढरपुर प्रवासासाठी एकटेच रवाना झाले. दरम्यान योगेश शिंपी व शरद पाटील हे सोबत गावी परत गेले.१२ दिवस उलटुन ही वडिलांचा फोन न आल्याने योगेश शिंपी व शरद पाटील हे दि. २४ जुलै २०२२ रोजी वडीलांचा शोध घेण्यासाठी पंढरपुर येथे गेले. पंढरपुर मधील सर्व आश्रम, चंन्द्रभागा नदी जवळ, विठ्ठल मंदीर परीसरात फोटो दाखवुन शोध घेतला. परंतु योगेश यांच्या वडीलांचा शोध लागला नाही. शेवटी हतबल होवुन योगेश शिंपी व शरद पाटील हे परत गावी आले. त्यांच्या सर्व नातेवाईकांकडे वडीलां विषयी विचारपुस केली.

परंतु वडीलांबाबत काहीही माहिती न मिळाल्याने अखेर योगेश शिंपी यांनी लोहमार्ग दुरक्षेत्रात वडिल हरविल्याची तक्रार दाखल केली असून बापु शिंपी यांचा शोध चाळीसगाव लोहमार्ग दुरक्षेत्राचे ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल एस. एम. बोरसे हे घेत आहेत. बापु शिंपी यांच्याबद्दल कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी ९८९०६३३४३५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन देखील लोहमार्ग दुरक्षेत्राच्या पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content